जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर
>माझे विचार माझे लेखन
या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG

विद्यार्थी चे लेखन निर्मिती ब्लॉग * FOLLOW MY BLOG

Monday, December 22, 2025

देशाचा खरा पोशिंदा


23 डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने माझा हा निबंध..

शेतकरी हा आपल्या देशाचा खरा पोशिंदा आहे. तो शेतात राबून आपल्यासाठी अन्नधान्य पिकवतो. ऊन, पाऊस, थंडी किंवा वादळ असो, शेतकरी कोणतीही तक्रार न करता मेहनत करतो. आपल्या कष्टातून तो गहू, भात, ज्वारी, भाजीपाला व फळे पिकवतो. आपण रोज जे अन्न खातो, ते शेतकऱ्याच्या घामाचे फळ असते.
शेती हे आपल्या देशाचे मुख्य व्यवसाय आहे. अनेक लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी पाऊस कमी पडतो, तर कधी जास्त पडतो. तरीसुद्धा तो हार न मानता पुन्हा कामाला लागतो.
म्हणूनच शेतकऱ्याचा आपण आदर केला पाहिजे. त्याच्या कष्टांची जाणीव ठेवून अन्नाचा अपव्यय टाळला पाहिजे. शेतकरी आनंदी असेल, तर देशही समृद्ध होईल.
म्हणून म्हणता येईल..

मातीशी नातं जोडलेला, घामाने शेत पिकवणारा,
अन्न देतो जगाला साऱ्या, तोच खरा पोशिंदा हमारा.
कष्ट त्याचे अमूल्य असती, मान द्यावा त्याच्या कामाला,
शेतकरी आहे जीवनदाता, नमन त्याच्या परिश्रमाला.

शेतकऱ्याला सलाम माझा  ..

  नितेश येवले 
इयत्ता सहावी 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर



1 comment:

देशाचा खरा पोशिंदा

23 डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने माझा हा निबंध.. शेतकरी हा आपल्या देशाचा खरा पोशिंदा आहे. तो शेतात र...