जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर माझे विचार माझे लेखन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
विद्यार्थी चे लेखन निर्मिती ब्लॉग * FOLLOW MY BLOG

Monday, November 24, 2025

खेळाचे महत्व..

खेळाचे महत्व..

मानवाच्या सर्वांगीण विकासामध्ये खेळांचे योगदान मोठे आहे. अभ्यासाइतकेच खेळदेखील मुलांच्या व्यक्तिमत्त्व घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी खेळ अत्यावश्यक आहेत. म्हणूनच “खेळल्याने होईल तंदुरुस्त, अभ्यासाने होईल हुशार” असे म्हटले जाते.

खेळामुळे शरीरातील सर्व अवयव सक्रिय राहतात. धावणे, उडी मारणे, बॉल फेकणे, पोहणे या क्रियांमुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. नियमितपणे खेळ खेळल्यास लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांपासून बचाव होतो. शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच सहनशक्ती आणि चपळता वाढते.

खेळांमुळे मुलांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित होतात. सामूहिक खेळांमधून सहकार्य, परस्पर आदर आणि टीमवर्क शिकायला मिळते. जिंकणे किंवा हरिणे कसे स्वीकारायचे, हा महत्त्वाचा जीवन धडा देखील खेळातूनच मिळतो.

खेळ मानसिक आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त आहेत. धावण्यामुळे आणि शरीर हालचालींमुळे ताण कमी होतो. मन प्रसन्न राहते. अभ्यासाचा ताण दूर होऊन शिकण्याची क्षमता वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमितपणे किमान एक तास तरी खेळावे.

देशाच्या प्रगतीतही खेळांचे महत्त्व खूप आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतात आणि देशाचा प्रतिष्ठेने झेंडा फडकवतात. आज क्रिकेट, हॉकी, कबड्डी, बैडमिंटन, कुस्ती, धावणे भालाफेक  अशा अनेक खेळांत भारतीय खेळाडूंनी जागतिक पातळीवर भरघोस यश मिळवले आहे.


खेळ हे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. ते शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि व्यक्तिमत्त्व सक्षम बनवतात. शाळांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी खेळांना अभ्यासाइतकाच महत्व दिले पाहिजे. शाळेमध्ये आयोजित केलेल्या खेळांच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आवडीने भाग घेतला पाहिजे .कारण निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते, आणि यासाठी खेळ हा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणून सर्वांनी आयुष्यभर  एक खेळ खेळायला पाहिजे..

धन्यवाद

रेणुका नायकवडी..

शाळा सुभाष नगर 

इयत्ता सहावी

1 comment:

क्रांतिसिंह नाना पाटील

           *क्रांतिसिंह नाना पाटील*       (क्रांतिकारक व समाजसुधारक)            *जन्म : ३ ऑगस्ट १९००* (येडे मच्छिंद्र, वाळवा तालुका सांगली) ...