पाणी हेच जीवन,
पाणी ही सर्व सजीवांना निसर्गाकडून मिळालेली अनमोल देणगी आहे. पाण्याला जीवन असेही म्हणतात. पाण्याशिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही. सर्व सजीवांना जगण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे.
पाणी ही आपली मुलभूत गरजा आहे. मनुष्याला फक्त पिण्यासाठी नाही तर आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भाडी धुण्यासाठी स्वच्छतेसाठी म्हणजेच दैनंदिन कामासाठी पाण्याचा उपयोग होतो. औद्योगिक क्षेत्रात तसेच ऊर्जा निर्मितीसाठी ही पाण्याचा उपयोग होतो. शेतीसाठी तर पाणी खूप गरजेचे आहे.
मानवी शरीर अन्नाशिवाय काही दिवस जिवंत राहू शकते पण पाण्याशिवाय जास्त दिवस जगूच शकत नाही. पाणी ही जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
पृथ्वीचा 73 टक्क्के भाग पाण्याने आपला आहे. तरीही पिण्यायोग्य पाणी खूप कमी आहे. वाढती लोकसंख्या गैरवापर इ. औद्योगिकरण, जंगल तोड, जल प्रदूषण, पाण्याचा गैरवापर इ. कारणांमुळे पाणी टंचाई जाणवते आहे.
प्रत्येक व्यक्तीने जर पाण्याचे महत्व समजून पाण्याचा उपयोग योग्य प्रकारे केला तर पाण्याची कमी भासणार नाही. म्हणतात ना-"थेंबे-"थेंबे थेंबे तळे साचे"
पृथ्वीवरील सजीव प्राण्यांना व वनस्पतींना पाण्याची नितांत आहे. कारण पाणी हेच जीवन आहे. पाण्याचे संवर्धन, करणे ही काळची गरज आहे आहे, आपन पाणी वाचवले तर नक्कीच आपले भविष्य सुरक्षित राहील. कारण पाणी नाही तर जीवन नाही..
जल है तो कल है....
धन्यवाद
रागिनी सुरेंद्र गौतम इयत्ता सहावी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा
Nice
ReplyDelete