बालदिन
भारतात १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आहे पंडित जवाहलाल नेहरु यांना लहान मुले फार आवडत असत. मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत पंडित नेहरू म्हणत की, आजची मुले उद्याचा भारत घडवतील म्हणून मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला
पंडित जवाहलाल नेहरूंनी मुलांना प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून खूप प्रयत प्रयत्न केले. मुलांवर चांगले संस्कार करावेत असे विचार माडले, बालदिन हा महत्वाचा दिवस आहे या दिवशी प्रत्येक शाळेत प्रश्नमंजूषा, भाषण, वादविवाद, कीडास्पर्धा, नृत्य, गायन इ कार्यक्रम आयोजित केले जातात.
बालदिन देशात बाल हक्क, बालशिक्षिण, बालसंगोपन इ. विषयी जागरुकता वाढवतो मुलांचे बालपण जोपासणे, त्यांना सुविधा पुरवणे ही आपली जबाबदारी आहे अनेक ठिकाणी मुलांना भेटवस्तू दिल्या जातात..
बालदिनादिवशी देशभर मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, दूरदर्शन, आकाशवाणीवर मुलांचे कार्यक्रम सादर केले जातात. काही लोक अनाथ, गरीब मुलांना कपडे, खाऊ व खेळणी वाटतात. देशभर मुलांसाठी चित्रपट नाटके दाखवली जातात.
बालदिन हा मुलांचा दिवस असतो. या दिवशी सर्वत्र मुलांचे कौतुक केले जाते. मुलांवर देशाची प्रगती अवलंबून आहे हा दिवस सर्व मुलांना फार आवडतो..
बालदिनाला आम्ही शाळेत बालसभा भरवतो. खास मुलांसाठी छोटे नाटक सादर करतो. बाह्मदिन हा खास मुलांना दिवस असती. म्हणून या दिवशी मुलांचे खूप लाड होतात.
बालपणी होते स्वच्छंद खेळाचे क्षण
बालपणी होते सर्व सुखाचे धन
बालपणीच्या आठवणीत हरपते मन
येणार नाही ते कधीच ते शिवनेरी क्षण
धन्यवाद
संजना जिनू राठोड जि. प. प्राथमिक शाळा सुभाषनगर
तालुका कोरेगाव जिल्हा सातारा
खूप छान लेख आहे.. बालपण तर सर्वांना आवडते..
ReplyDeleteNice artical
ReplyDelete