आयुष्य
कधी कधी वाटते हरलोय का आपण आयुष्यात??
म्हणजे जे आपण मिळवण्याचा प्रयत्न केला ते सगळ दूर निघून जातं. कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट कमवायला तरी ती गोष्ट मिळत का नाही. आयुष्याचं कसं असतं ना? आपण लहान होती तेव्हा वाटायचं की मोठे झाल्यावर सगळं सुरळीत होईल पण आता मोठे झालोय तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही ना काही सुटत जात आहे प्रयत्न केल्यावर यश मिळतं असं म्हणतात पण कधी कधी ते प्रयत्न कमी तर पडत नाहीत ना? हा प्रश्न सारखा मनामध्ये येत राहतो. आपण या आशेवर जगत असतो जे होतं ते चांगल्यासाठीचं होतं आणि जे होणार आहे ते पण चांगल्यासाठीचं होणार आहे... ठीक आहे दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतं पण स्वतः त्या प्रत्येक गोष्टींवर कशी मात करायची हे स्वतःलाच ठरवायचं असतं.
आयुष्यभर सोबत असून, जवळ कधी वसत नाही
एकाच घरात राहून आम्ही, एकमेंकास दिसत नाही.
हरवला ती आपसांतला, जिव्हाळ्याचा संवाद
एकमेकांस दोष देऊन, नित्य चाले वादविवाद.
धाव धाव धावती आहे, दिशा मात्र कळत नाही. जगती आहोत काहीच कसला मेळ नाही.
इतकं जगून झालं पण, जगायलाच वेळ नाही. हृदयाचे पाऊल कधी, हृदयाकडे वळत नाही.
क्षण येईल असा घेऊन जाईल हा श्वास. अर्ध्यावर थांबलेला , असेल जीवन प्रवास.
अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला, डोळे भरुन बघून घ्या...
आयुष्य खूप सुंदर अहि ही. ते जगता आलं पाहिजे... दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद शोधा, घ्या हे म्हणायाला फार फार सोपं अहि पुण अनुभवायला खूप अवघड. आयुष्यामध्ये जिंकलो तरी आनंद शोधा आणि हरलो तरी... कारण आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगायला शिका...
आयुष्याला म्हणायचं, घे किती परीक्षा घ्यायची ते... मी तुझ्या तुझ्या प्रत्येक परीक्षेत पास व्हायला तयार आहे...
- धन्यवाद
- आरोही गोरेगावकर
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा
Very nice
ReplyDeleteNice Sundar lekh ahe
ReplyDeleteNice Sundar lekh ahe..
ReplyDelete